Saturday, September 22, 2018
Saturday, September 15, 2018
पु.ल. एक विचार - (एक शून्य मी )
एक शून्य मी ह्या पुलंच्या पुस्तकातील पुढील विचार आवडला, तो असा - "आमची दुःख समजणारा नेता आहे, असा विश्वास अनुयायांना वाटत नाही, तोपर्यंत त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. "
खरयं, आजची राजकीय परिस्थिती बघितली की ह्या वाक्याचा अर्थ कसा लावावा हेच कळत नाही .
पक्ष तर भारंभार आहेत ,स्वतःचाच आत्मगौरव करणारे नेतेही त्या-त्या पक्षांमध्ये आहेत. पण जनतेचा कोणावरही विश्वास नाही.
समाजात असणारे दैनंदिन प्रश्न, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा , तरुणांना नोकऱ्या ह्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, त्याबरोबरच कोणतेही सरकार आले तरी ह्या रोजच्या जीवनातील प्रश्नांना उत्तर किंवा तोडगे निघतच नाहीत. सत्ताधीश व विरोधक यांच्यात तुम्ही काय केलं ,आम्ही काय केलं ,हे कोळसे उगाळण्यात वेळ जातो.समाजाच्या प्रश्नांकडे बघणार कोण ?
स्त्रियांवर होणारे अत्याचार, निरपराधांच्या हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न ,बंद पडत असणारे उद्योगधंदे त्यामुळे वाढणारी बेरोजगारी आणि त्यासंबधित न्यायालयात प्रलंबित असणारे खटले अशा विळख्यात सामान्य माणूस अडकलाय , आणि राजकीय स्थिती बघता असं कोणतंही नेतृत्व नाही की, ते आम्हाला आमचं वाटावं !
एकमेकांवर ताशेरे ओढण्यात संसदेतील कार्यकाळ सपंतो .जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची खुर्ची सांभाळण्यातच काम काजाची वर्षे निघून जातात. तळागाळातल्या माणसांचा विकास हा फक्त त्यांच्या निवडणूक जिंकण्यापुरता गोंडस पण फसवा अजेंडा असतो.
"नेमेचि येतो पावसाळा" याप्रमाणे पुन्हा निवडणुकीच्या काळात हेच नेते साम,दाम,दंड,भेद वापरून मतदारांचा बळी घेतात. निवडून कोणीही आले तरी दुःख समजणारा नेता आम्हाला मिळत नाही. आणि दुर्दैव इतकं की, विरोधकही जनतेची बाजू मांडायला तेवढा खंबीर राहिलेला नाही .कधी असंही वाटतं की आपली लोकशाही ही हुकूमशाहीच्या मार्गावर चालली की काय ?
म्हणुनच राजकारणात सर्वासोबत चालणाऱ्या नेत्याची निवड व्हायला हवी..ही अस्थिर व्यवस्था आपण बदलु शकतो.एक सशक्त मतदार म्हणुन...
आजच्या तरुणांकडे ,भावी पिढी घडवण्याची मोठी ताकद आहे.कारण आपला देश हा तरूणांचा देश म्हणुन आेळखला जातो..
पद्मा साहेबराव...
Sunday, September 2, 2018
पु.ल.... मला भावलेले!!!
पु.ल.... मला भावलेले!!!
देव व धर्म ह्या धूर्त कल्पना सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत. हेही म्हटले तर पुन्हा पुलंचीच शब्द येतात ,आणि बरोबरही आहे, प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी शिरकाव केलेला दिसतो आणि देवाबद्दल असलेल्या श्रद्धेपेक्षा विशिष्ट लोकांच्या गटाचा तिथे प्रभाव दिसतो.निवडणुकीच्या वेळी या धार्मिक ,श्रद्धाळू भक्तांचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्याकडे ओढले जाते. भीतीपोटी लोकही नको असलेल्या समूहांना पाठिंबा देतात. त्याबरोबरच अधंश्रध्देची जोड मिळाल्यावर भोंदू तिथले संस्थानिक होतात. येणारा भक्त त्यांची प्रजा असते. हिच प्रजा मानसिक गुलाम कधी होते हे कळत नाही .
गुलामगिरी स्वीकारल्यावर मग आपण स्वतंत्रपणे विचारच करत नाही .भोंदूगिरी करणारे बुवा आणि राजकारणी जेव्हा एकत्र येतात ,तिथेच मग सौदेबाजी सुरू होते म्हणून आपण डोळसपणाने देव अनुभवावा , नाहीतर दहा-दहा हजार करोडचे आसाराम बापू कधी तयार होतात,हे भक्तांना कळेपर्यंत फार ऊशीर झालेला असतो.
म्हणुनच देवावरची भक्ती असो, किवां राजकारणातील शक्ती, हि डोळसपणे तपासायला हवी... कुठल्याही लाटेत वहावत जाणे..हे धोकेदायक आहे.
पद्मा साहेबराव...
Friday, August 31, 2018
विचारमंथन
विचार मंथन-
काल,आज आणि ऊद्या ???
आज डोळ्यादेखतं अन्याय घडताहेत .धर्माच्या जोडीला प्रांत आणि भाषा रक्तपाताची कारणं होऊ घातले आहेत. आणि हे खूप खरे आहे. म्हणजे त्यांनी (पुलंनी) ज्यावेळेस हा विचार मांडला असेल ,तेव्हा आजच्यासारखीच परिस्थिती असेल का? हो ,नक्कीच! कारण, विनोदी अंगाने सर्व लिखाण करणारे पु.लं जेव्हा असा विचार मांडतात ,तेव्हा नक्कीच त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.
आजही आपण समाजात वावरतो ,निरीक्षण करतो तर आपल्याला हेच दिसतं की,आज तर सोशल मीडियामुळे आपल्याला जगात काय चाललंय, ते घरात बसून समजतं .तेव्हा कुठल्याही अन्यायावर, न आवडणाऱ्या घटनांवर काही आवाज उठवला तर तेथे रक्तपात ,जाळपोळ, झुंडशाहीने होणारे हल्ले हे त्याचेच उदाहरण आहे.
जगात सोडाच ,पण भारतात धर्म ,प्रांत ,भाषा यावरून दंगली घडत आहेत. त्या बरोबरच आणखी म्हणजे वैचारिक स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत . हिंदुत्वाच्या नावाखाली पुरोगामी विचारांच्या व्यक्तींचीही इथे हत्या केली जाते आहे.सामान्य लोकांची सुरक्षितपणाची भावना कमी होत चालली आहे.कोणावरही कोणाचा विश्वास राहिला नाही,इतकी आपली लोकशाही केविलवाणी झाली .
धर्माच्या जोडीला जातीयवादाच पारडे जड होतंय .तरुण वर्गही बेरोजगार आहे. काम नसल्यामुळे त्यांचे माथी भडकवण्याचे काम हे काही राजकारण्यांकडून करून घेतलं जातंय .नोकरीच, शिक्षणाचं आमिष त्यांना दाखवले जाते .त्यात त्यांना वेगवेगळ्या जाती मध्ये विभागून आरक्षणाचे गाजर ही दाखवले जातात .आणि मग मागण्या मान्य झाल्या नाहीत ,तर हेच तरूण रक्त झुंडशाहीने विघातक गोष्टींकडे वळत आहे. मला असं वाटतं की, माणसाची वाटणी ही प्रांत, भाषा धर्माबरोबरच आता जाती- जातीत होऊ लागली आहे.
अशा सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेतला तर आपण समाजात माणूस म्हणून जगताना, हे जे मी काय करतोय.. ते बरोबर आहे की नाही, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
पद्मा साहेबराव...!

Subscribe to:
Posts (Atom)