माझ्या भावाची मुलगी मयुरी हाँगकाँग ला असते. तिच्या डिलिव्हरीसाठी भाऊ वहिनी तिच्याकडे तीन महिन्यासाठी गेलेले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आम्हाला व्हाट्सअप वर पाठवत होते. ते बघुन माझ्याही मनात हाँगकाँग बघण्याचे स्वप्न साकारत होते. ती इच्छा मी घरात बोलून दाखवली , आणि मग काय... स्वप्न सत्यात उतरेल, असे मला वाटू लागले . सर्वांचा होकार...आलेली संधी घालवायची नव्हती. अट्टाहास एकच.. तुला एकटीला जावे लागेल. थोडी घाबरले होते. पण , इतका सहज आलेला होकार म्हणजे एका स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य होतं . त्याचा मला फायदा घ्यायचा होता.
आता जाण्याची तयारी सुरू झाली. सगळे प्रोत्साहन देत होते. 22 जुलै 15 ही फ्लाईटचे बुकींग केले . प्रश्र्न एकच होता की, visa on arrival असणार होता. पंधरा दिवसांचा free visa! मयुरी मला तिकडचे नियम समजावून सांगत होती .
माझ्या नवऱ्याचे बारा-तेरा देशात कंपनीमुळे जाणे- येणे झालेलं होतं.तेही खूप जास्त प्रमाणात अतिशय काळजी घेत सगळं काही मला समजावून सांगत होते. तोपर्यंत मला सोपे वाटत होते सगळे! जाण्याचा दिवस उजाडला तसं माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कारण मुंबई एअरपोर्ट पासून मी अगदी एकटी असणार होते . सर्वांना मी खूप खंबीर वाटत होते. पण मनातून खूप घाबरलेली होते. त्याबरोबरच मला स्वतःला सिद्ध करायचे होते, आय कॅन डू इट!! मुंबई एअरपोर्ट फ्लाईट ची वेळ स॑ध्याकाळी आठ वाजेची.. एन्ट्री केली. इमिग्रेशन ला मराठी मुलं.. एक स्टेप पार केली. परंतु घामाघूम झाले. सगळी प्रोसिजर पूर्ण करून plane मध्ये पाऊल टाकले, गड सर केला होता. पण आता पुढे काय?
दुसऱ्या दिवशी h.k वेळेनुसार सकाळी सहा वाजता flight land होणार होती. हाँगकाँग ला ऊतरले, आणि माझ्या परीक्षेला सुरूवात झाली. साधारण पणे मला जितके ईन्ग्लिश येत होते. त्याचा तिथे काहीही उपयोग झाला नाही. मला emigretion counter मध्ये बाजूला केले. कारण माझ्याकडे व्हिसा नव्हता. सर्व भारतीयांना वेटींग रूममध्ये पाठवले.तेथील स्टापला आपले इंग्रजी हि समजत नव्हते. मयूरी तिथे सोशल वर्कर आहे, म्हटल्यावर तिची त्यांनी पुर्णतः माहिती घेतली. जे लोक कुटुंबासह होते, त्यांना ते सोडत होते, माझ्या सारख्या एकटी व्यक्तीला थांबवत होते.
मयुरी बाहेर वाट बघत होती. कोणाशीही संपर्क होत नव्हता. मोबाईल बंद झाला होता. ईकडे भारतात ही सगळे घाबरले होते. असे चार तास गेले....
मग त्या लोकांनी मयुरी शी फोनवर आमच्या नात्याची बरीच माहिती विचारली. ऊलट तपासणी केली म्हटलं तरी चालेल. आणि शेवटी . त्यांनी हसत -हसत मला welcome केले.
आणि मी स्वतः ला सिद्ध केले.
ह्या अनुभवातुन एक शिकले की, ह्या जगात काही ही अशक्य नाही..। जेव्हां एकटे प्रवास करतो तेव्हा आपण सुंदर अनुभव घेत असतो. हे कुठल्याही पुस्तकातुन किंवा कोणाच्याही सोबतीने नाही शिकत..!!
No comments:
Post a Comment