गणपती ऊत्सव ....आनंदाचा सोहळा...चैतन्य,ऊत्साह..मनावरील ताण कमी होऊन सकारात्मक बदल घडवून देणारे दिवस...।सर्व सृष्टी आनंदते. श्रावण संपून भाद्रपदाची सुरुवात..सगळी कडे हिरव्या रंगाचे गालिचेच जणू काही। या हिरवेपणा वर सूर्याचा सुवर्ण महोत्सव चालू असतो .
बाजारात सगळीकडे गजबजाट वाढला होता. प्रत्येक दुकान गर्दीने ओसंडून वाहत होते .जिथे बाप्पाचे स्टॉल लागले होते तेथेच इतरही सामान मिळत होते. पूजा साहित्य आणि डेकोरेशनच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत होत्या.
मी बाप्पा साठी फुलं व दुर्वा घेतल्या आणि तिथेच उभी असताना एक तरुण जोडपे पूजा साहित्य घ्यायला आले. तिने दूर्वाआहेत का? विचारलं त्या बाईने दुर्वांची किंमत सांगितली .."दहा रुपये!
ती तरूणी म्हणाली.." निवडलेल्या नाही का ?
हे बघा ताई, निवडायला वेळ नाही मिळाला, नाही तर दोन जुड्या झाल्या असत्या दूर्वांच्या !"फुलंवाली म्हणाली.तेवढ्यात ती तरुणी म्हणाली ,मावशी निवडलेल्या असत्या तर बर झालं असतं .यापेक्षा तुम्हाला दुप्पट किंमत दिली असती!
तिचा नवरा व त्याच्याबरोबर असलेला मुलगा, बहुधा त्याचा मित्र असावा, एकमेकांकडे बघून हसायला लागले . ती तरुणी निवडलेल्या दुर्वांवर अडून राहिली होती. नवरा म्हणाला ,"घ्यायच्या तर घेऊन टाक, नाहीतर मग दुसरीकडे निवडलेल्या बघ बरं !"आणि मग त्या दूर्वा घ्याव्या की नाही, या संभ्रमात निर्णय घ्यायला ती खूप गोंधळली होती.
या प्रसंगाची मला खूप गंमत वाटली.कारण तिथे थोड्याच वेळा अगोदर मीही फुलांची माळ विचारली,तर मला ती महाग वाटली.म्हणून मी फुलं घेऊन घरी च हार बनवणार होते.
मनात विचार आला...कोण बरोबर आहे...मी की ती ..?
उत्सव ,समारंभ करायचे , सण साजरे करायचे ते फक्त एक इव्हेंट म्हणूनच का ? तिला असा कितीसा वेळ लागणार होता दुर्वा निवडायला,,?
आम्हाला सगळं इन्स्टंट हवय ,देवाची भक्ती ही पैशांपुढे कमी व्हायला लागली का ?
फक्त सेल्फी,फोटोसेशन यामध्ये सर्व सण ,समारंभ, उत्सव अडकून पडतील ,असंही वाटतं .
सहज मनात एक विचार चमकून गेला की ,काही काळानंतर गणपतीचे स्टॉल जिथे असतील तिथे बोर्ड असतील की... येथे विधीवत प्राणप्रतिष्ठा केलेले गणपती मिळतील आणि लोकांची तिथेच जास्त गर्दी होईल!

पद्मा साहेबराव....
No comments:
Post a Comment