पहिला दिवस...
२०१८ लिहिता लिहिता २०१९ लिहावे लागले. थोडी गडबड होते ना...हाताला सवय व्हायलाकाही वेळ जाऊ द्यावा लागेल. आणि ते सवयीचं होता होता परत इतक्यात २०२० लिहावे लागेल..
काळ किती पटकन सरकतो आहे... नाही का..?
क्षण निसटून चाललाय... तरीही माणूस वाद-विवाद,हेवेदावे, द्वेष, मत्सर यातच अडकलाय..!
मरण हे अतिंम सत्य माहीत असुनही अमरत्वाचा कमरपट्टा बांधल्यासारखा फक्त स्वार्थ साधला जातोय....प्रत्येक ठिकाणी..!
माझं जे आहे ते फक्त माझं आहे..पण तुझंही मलाच हवं, ही लालसा वाढत चालली आहे.
मुखवट्यांचं जगं जाऊन खरे चेहरे समोर यायला हवे.परत एकदा सत्ययुगाचा अनुभव यायला हवा... कसं असेल ते कल्पनेतलं जगं..,माणसाला माणसांची भिती वाटणार नाही.. वाईट क्रुत्य करण्यासाठी मनात वाईट विचारच येणार नाही..एकमेकांना समजून घेण्यासाठी विश्वासाला खूप महत्व असेल..दिलेली आश्वासन, शब्द पाळली जातील..भ्रष्टाचार, व्यभिचार, खोटेपणा हे शब्द च शब्दकोशातुन हद्दपार होतील.प्रत्येक नाते जपलं जाईल, सावरलं जाईल, त्याचा आदर केला जाईल.समाजात असणारा प्रत्येक घटक निर्भयपणे जगु शकेल..
निवडणूक ही उमेदवार च्या पैशापेक्षा सामाजिक बांधिलकी, चारीत्र्य ह्या गोष्टी वर विचार करून घेतली जाईल..गरीब- श्रीमंत ही दरीच नसेल...सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सर्वांना समान संधी असेल..
असे काही अघटित घडणारच नाही की, आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतील ,किंवा स्रीयावंर ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलने करावी लागतील...! घडेल असं सर्व आपल्या विविधतेने नटलेल्या भारतात.?
माझ्या भारतात प्रांतिक, भाषिक, जातिय व धार्मिक वादच होणार नाहीत.।?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीप्रधान अशा माझ्या देशात बळीराजाचा बळी जाणार नाही.. त्याला हया समाज रचनेत उच्च स्थान दिले जाईल...
जो आज समाजव्यवस्थेत मनोरा दिसतोय तो उलटा दिसायला हवा...!
ज्या घटकांवर देशाचा कणा ताठ आहे ,ते शेतकरी, कष्टकरी, कामगार,पोलिस, सैनिक, युवा पिढी, विद्यार्थी व उपेक्षित असणारे सर्व जण जेव्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील व ते चित्र स्पष्ट होईल तेव्हा भारतातील जगं हे जगातंही आदर्श असेल.!!
पण.. हे सर्व कधी होणार.? की कल्पनाच राहील..!
नव्या वर्षाच्या ह्या साध्यासुध्या अपेक्षा करायला काय हरकत आहे.!
पद्मा साहेबराव....!!!

खुप छान...! 👌👌
ReplyDeleteभारतीय जनांच्या मनी ज्या वसल्या
ReplyDeleteव्यक्त झाल्या त्या अपेक्षा-इच्छा,
त्या होवू दे सुफळ संपूर्ण
ह्याच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
अप्रतिम विचार मांडता आपण!